Breaking

बुधवार, १६ जून, २०२१

"राज्यात प्राध्यापक भरती लवकरच; तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढणार : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा.उदय सामंत"

 


       गोंदिया : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र आता समितीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल. तसेच तासिका प्राध्यपाकांच्या मानधनात वाढ केली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. गोंदियात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले. 

     कोरोनामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापक भरती रखडली होती. मात्र आता तज्ज्ञ समितीने या प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे. आता ती फाईल वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. येत्या दोन तीन दिवसात त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, असे उदय सामंत म्हणाले.

      तसेच तासिका प्राध्यापकाच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. राज्यातील विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होणार नाही. त्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असेही उदय सामंत म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा