Breaking

बुधवार, १६ जून, २०२१

लस निर्मितीसाठी गाईच्या वासराच्या सिरम चा उपयोग, त्यासाठी केली जाते वासरांची हत्या? जाणून घ्या काय आहे व्हायरल मेसेजमागील सत्य.



 नवी दिल्ली - कोरोनावरील लस कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या बछड्याच्या सीरमचा वापर केला जात आहे. त्यासाठी, 20 दिवसांपेक्षाही कमी वयाच्या बछड्यांना ठार मारण्यात येते. असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर गौरव पांधी यांनी एका माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे केला आहे. 

      त्यावर प्रेस इन्फॉर्मेशन बुरो - गवर्नमेंट ऑफ इंडिया ने स्पष्टता दिली आहे की, लसीमध्ये बछड्याच्या सिरम चा वापर केला जातो, याला चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे.  covaccine  लसीमधे  बछड्याच्या सिरम चा वापर फक्त विरो सेल्स वाढवण्यासाठी केला जातो. आणि ही पद्धत फार वर्षांपासून पोलिओ, रेबीज, इन्फ्लुएंझा यासारख्या लसी तयार करण्यापासून वापरली जात आहे. आणि लस बनविण्याची हीच शास्त्रीय पद्धत आहे. "या व्हिरो सेल्सची वाढ झाल्यानंतर ते स्वच्छ केले जातात. त्यावर वासराच्या सीरमचा अंशही ठेवला जात नाही. त्यानंतर हे व्हिरो सेल्स कोरोनाव्हायरसने व्हायरल ग्रोथसाठी इन्फेक्टे केले जातात. व्हायरल ग्रोथच्या प्रक्रियेत व्हिरो सेल्स पूर्णपणे नष्ट होतात. त्यानंतर हा व्हायरसही निष्क्रिय आणि शुद्ध केला जातो. हा निष्क्रिय व्हायरस लशीसाठी वापरला जातो. लशीच्या शेवटच्या फॉर्म्युल्यात वासराच्या सीरमचा वापर होत नाही", अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.


    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा