Breaking

शनिवार, १९ जून, २०२१

"दोन ते चार आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट? टास्क फोर्सचा धोक्याचा इशारा!"





        मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अद्यापही संपलेली नाहीये. मात्र, इतक्यातच आता नव्या संकटाची चाहूल लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनासाठी तयार झालेल्या टास्क फोर्सने इशारा दिला आहे की, ज्या प्रकारे गेल्या तीन दिवसांपासून बाहेर गर्दी दिसून येत आहे, ते पाहता असे संकेत मिळत आहेत की, पुढच्या दोन ते चार आठवड्यांमध्येच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्र आणि मुंबईवर आक्रमण करु शकते. मात्र, असं देखील सांगण्यात आलंय की, ही लाट लहान मुलांवर तितका परिणाम करणार नाही जितका परिणाम निम्न मध्यम वयाच्या लोकांवर करेल जे अद्याप या लाटेचा संपर्क झालेला नाही.

       उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील झाली या वेळी ठाकरे साहेब बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्याचवेळी टास्क फोर्सने या तिसऱ्या लाटेसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. या बैठकीत टास्क फोर्सचे सदस्य, राज्याचे आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सामील होते. या बैठकीत, सध्याच्या आकडेवारीनुसार, तिसऱ्या लाटेमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत दुप्पट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

     बेसावध राहिलो तर तिसरी लाट येणारच बैठकीत असं देखील सांगण्यात आलंय की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत 19 लाख प्रकरणे समोर आली होती, जी आता दुसऱ्या लाटेत दुप्पट होऊन तब्बल 40 लाख झाले आहेत. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलंय की, दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्यानंतरच्या चार आठवड्यांतच ब्रिटनला तिसऱ्या लाटेला सामना करावा लागतो आहे. जर आपण सावधान राहिलो नाही आणि कोरोना टाळण्यासाठीचे नियम पाळले गेले नाहीत तर आपण देखील त्याच परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.महाराष्ट्रात सध्या सुरुय अनलॉकगेल्या दोन आठवड्यांदरम्यान राज्य सरकारने आठवड्याचा पॉझीटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेनुसार पाच-स्तरिय अनलॉकची प्रक्रिया लागू केली आहे. सध्याच्या या प्रक्रियेनुसार, 15 हून अधिक जिल्हे आणि नागपूर आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये सूट दिली गेली आहे. या दरम्यान, अनियंत्रित गर्दी, कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणे, सध्या चिंतेचं कारण मानलं जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा