Breaking

शनिवार, १९ जून, २०२१

"देशातील कोरोना रुग्ण संख्येत घट व मृत्यू संख्या ही 2000 च्या खाली"



नवी दिल्ली :  देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची गती कमी होताना दिसत आहे. 73 दिवसांनंतर देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आठ लाखांहून कमी झाली आहे तर 58 दिवसांनंतर मृतांचा आकडा हा दोन हजारांपेक्षा कमी झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 62,680 रुग्ण सापडले असून 1587 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 88,977 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. काल एकाच दिवसात कोरोनाचे 28,084 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. 

   त्याआधी गुरुवारी देशात 67,208 कोरोना रुग्णांची भर पडली होती. आतापर्यंत देशात 26 कोटी 89 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 32 लाख 59 हजार कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत.


देशातील आजची कोरोना स्थिती : 


  एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 97 लाख 62 हजार 793 

एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 85 लाख 80 हजार 647 

एकूण सक्रिय रुग्ण : 7 लाख 98 हजार 656

एकूण मृत्यू : 3 लाख 83 हजार 490

आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 26 कोटी 89 लाख 

देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा 1.29 टक्के असून बरे होण्याचे प्रमाण हे 96 टक्के इतकं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा