Breaking

रविवार, २० जून, २०२१

"कोल्हापूर जिल्ह्यात रूग्ण संख्येत अल्पशी घट व दिलासा ; मात्र ३७ मृत्यू संख्या"

 



प्रा.अक्षय माने/ कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :


           कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात १०५० नवे बाधित रुग्ण सापडले असून कोरोनाने मयत झालेल्या रुग्णांची संख्या ३७ आहे.

      जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत असून गंभीर बाधित रुग्णसंख्या रोडावत आहे. तसेच आठवडाभरात कोरोनामुक्त रुग्णसंख्या वाढले असून कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब अंशतः दिलासादायक आहे.


      पुनश्च जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी कोरोना मुक्तीसाठी असेच सहकार्य प्रशासनाला केलं तर काही दिवसात कोरोना मुक्त जिल्हा होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे समस्त नागरिकाकडून पुन्हा असंच उत्तम सहकार्य जिल्हा प्रशासनाला मिळावा अशी अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा