Breaking

गुरुवार, १७ जून, २०२१

"शिवाजी विद्यापीठाच्या पुनःश्च परीक्षेच्या तारखा जाहीर : मा.गजानन पळसे, प्र.संचालक,परीक्षा व मुल्यमापन मंडळ"

 

मा. गजानन पळसे,प्र.संचालक, परीक्षा विभाग ,शि.वि., कोल्हापूर


प्रा. अक्षय माने / कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :


    शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व आरोग्याची काळजी घेऊन शासनाच्या अधिनियमाना अनुसरून ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे  आयोजन करून ते यशस्वीपणे पूर्ण केले. मात्र काही कारणामुळे वंचित राहिलेला विद्यार्थ्यांचा सारासार विचार करून पुन:श्च परीक्षेचे नियोजन करण्यात आले.

        शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील ऑक्टो/ नोव्हें. २०२० च्या हिवाळी सत्रातील परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या आहेत. तथापि', शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील ऑक्टो/ नोव्हें. २०२० तील  कोविड -१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जे विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत (विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या लिंकद्वारे ज्या विद्यार्थ्यांनी माहिती भरलेली आहे) अशा विद्यार्थ्यांच्या पुन:श्च परीक्षेच्या प्रारंभ तारखा सोबत पाठविण्यात येत आहेत. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.

       सर्व महाविद्यालयांनी सदर माहिती सर्व संबंधित विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी यांच्या निर्देशनास आणावे अशा प्रकारची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या १७ जून,२०२१च्या पत्राद्वारे परीक्षा विभागाकडून प्राप्त झाली आहे.


टीप : परीक्षेचे वेळापत्रक व अधिकच्या माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा