इंटरनॅशनल स्पेस सेंटर येथे काम करणारे नासाचे अंतराळ संशोधक आणि फ्लाईट इंजिनियर Mark T Vande Hei यांनी नुकताच हिमालय पर्वतरांगांचा नेत्रदीपक फोटो शेअर केला. अंतराळातून ही पर्वतांची रांग नेमकी दिसते तरी कशी, याची स्पष्टोक्ती या फोटोच्या माध्यमातून होत आहे. निसर्गाची किमया म्हणा किंवा दैवी चमत्कार, ही पर्वतशृंखला पाहताना एकदाच साकारली जाणारी कलाकृती ज्याप्रमाणे पाहणाऱ्यांच्या मनावर आरुढ होते, तसंच काहीसं होत आहे.
भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारी भागाला दुभागणाऱ्या हिमालय पर्वतरांगा दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये स्थिरावल्या आहेत. पृथ्वीवरील अनेक उंच शिखरं या पर्वतशृंखलेचा भाग आहेत. ज्यामध्येच माऊंट एव्हरेस्टही सहभागी आहे. अशा या पर्वतरांगेची झलक सर्वांना अविश्वसनीय वाटली.
सोशल मीडियावर हा फोटो वाऱ्याच्या वेगानं पसरला आणि मग त्यावर प्रतिक्रियांची बरसात होण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं आणि हिमालयाच्या फोटोच्या निमित्तानं अगदी हा हिमालयची सर्वांच्याच जवळ आला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा