Breaking

रविवार, ६ जून, २०२१

"धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या दक्षता कमिटीच्या वतीने गावातील छोटे व्यापारी व व्यावसायिक यांची केली कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट"

 

गणेश कुरले/ धरणगुत्ती प्रतिनिधी :


     धरणगुत्ती ग्रामपंचायत सातत्याने  कोरोना महामारीच्या या काळात नागरिक सुरक्षित कसे राहतील यासाठी प्रयत्नशील असून त्याचाच भाग म्हणून गावातील एकूण ८६ छोटे व्यापारी व व्यावसायिक  यांची कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी ३ जण पॉझिटिव्ह होते. या  तिघांना महालक्ष्मी यात्री निवासामधील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. येथील प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सुरक्षेमुळे गावातील नागरिक आनंदी व समाधानी आहेत.

        तसेच धरणगुत्ती गावच्या कोरोना दक्षता समितीची आढावा बैठक आनंदी चर्चेच्या माध्यमातून सांगोपांग पद्धतीने संपन्न झाली. सुरुवातीस मा. शेखर पाटील यांनी या आढावा बैठकीत प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी सदर बैठकीत SP मा.जयश्री गायकवाड मॅडम या उपस्थित होत्या त्यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य कोमल कडोले व त्याचबरोबर जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP मा.रामेश्वर वैजने यांचा सत्कार भालचंद्र लंगरे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते झाला.

      सदर आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना मा. गायकवाड मॅडम म्हणाला की, धरणगुत्ती ग्रामपंचायत सुरुवातीपासून गावातील कोरोना मुक्तीचा जागर करीत व गावातील नागरिकांची सुरक्षिततेला प्राधान्य देऊन केलेलं काम वाखाणण्याजोगा आहे अशा प्रकारचे गौरवोद्गार त्यांनी या प्रसंगी काढले. त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील ,सर्व कोरोना योद्धे हे उत्कृष्ट काम करतात हे आजच्या कोरोना आढावा बैठकीच्या माध्यमातून दिसून आले. सरतेशेवटी त्यांनी धरणगुत्ती ग्रामस्थांना कोरोना महामारीबाबत जागृत राहण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या व्यापारी व नागरिकांच्यावर शासन नियमाप्रमाणे दंड वसूल करावा तसेच बाहेर फिरताना मास्कचा सर्रासपणे वापर व गर्दी टाळण्यासाठी ही आव्हान केले.

      सदर कोरोना आढावा बैठकीचे आभार प्रदर्शन उपसरपंच जीवन रजपूत यांनी केले व या  बैठकीस शिरोळ पोलीस ठाण्याचे प्रमुख मा.कुंभार साहेब, दक्षता समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व अन्य घटक उपस्थित होते ही बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा