Breaking

रविवार, २७ जून, २०२१

"जयसिंगपूर मध्ये छञपती शाहू महाराज जयंती साध्या पद्धतीने मात्र आनंदात साजरी"

 



 रोहित जाधव/ शिरोळ तालुका प्रमुख


     जयसिंगपूर शहरात  राजर्षी छञपती शाहू महाराज जयंती सोहळा जयसिंगपूर नगरपरिषद, शहरातील विविध सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने साध्या पद्धतीने मात्र आनंदात साजरी करण्यात आली.

    लोकराजा शाहू महाराजांनी शेतकरी, गोरगरीब व वंचित घटकांच्या  सन्मानार्थ व हितार्थ आपले आयुष्य खर्च केले. सर्व धर्मीय व जातीय वसतीगृह बांधून कोल्हापूर संस्थानातील सर्व घटकांना शिक्षण घेण्यासाठी सवलती उपलब्ध करून दिल्या.डाॅ बाबासाहेब आंबेडकर साहेबांना आवश्यक ती मदत व सहकार्य  करून आरक्षण मिळवण्याचे फार मोठे कार्य केले. म्हणूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माझी जयंती केला नाही तर चालेल;पण छञपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा. अशा प्रकारचा मोठा आदर व्यक्त त्यांनी केला होता.आज संपूर्ण महाराष्ट्रात या थोर व्यक्तीची जयंती साजरी मोठ्या थाटामाटात पुरोगामी विचारांचा जागर करीत साजरा केली जातो.                               

      यावेळी नगराध्यक्षा डॉ.निती माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, पक्षप्रतोद बजरंग खामकर, नगरसेवक संभाजी मोरे,सर्व नगरसेवक आणि नगरसेविका  त्याच प्रमाणे स्वराज्य क्रांती जन आंदोलनाचे संस्थापक आदमभाई मुजावर,जिल्हा अध्यक्ष कैलास काळे, तालुका अध्यक्ष गजानन पवार, आसिम फारूखभाई पठाण, चंद्रकात जाधव, शिवसेना शहर प्रमुख तेजस देशमुख,कॉम्रेड रघुनाथ देशिंगे , आर पी आयचे अब्दुल बागवान , दिगंबर सकट यांच्या बरोबर इतर मान्यवरांच्या उपस्थितीत छञपती शाहू महाराज जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा