![]() |
श्रेणिक चौगुले |
सौंदर्या पोवार : जयसिंगपूर प्रतिनिधी
जिल्हा ग्रामीण कार्यालय राष्ट्रवादी भवन श्री शाहु मार्केटयार्ड ,कोल्हापूर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा नाम जयंतरावजी पाटील साहेब यांच्या संघटनाबांधणी करण्याच्या दृष्टिने केलेल्या सुचनेस अनुसरून जिल्ह्याचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी मा.नाम हसनसो मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मा. ए.वाय.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष मा यासिन मुजावर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना पदभार देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये जयसिंगपूरचे कार्यशील व संवेदनशील पदाधिकारी श्रेणीक चौगुले यांची पक्ष बांधणी व कार्यशैली पाहून पुनश्च एकदा कोल्हापूर जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे सरचिटणीसपदी फेरनियुक्ती करून मोठी जबाबदारी आली आहे.
जिल्हा कार्याध्यक्ष मा.अनिल साळोखे,मा. मदन कारंडे,माजी आमदार मा.राजू आवळे, सेवादल जिल्हाध्यक्ष मा बाळासाहेब देशमुख, कामगार सेल प्रदेश उपाध्यक्ष मा मुनीर शेख, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष मा.अनिरूद्ध गाडवी, विधार्थी सेल जिल्हाध्यक्ष मा निहाल कलावंत, इचलकरंजी विधानसभाध्यक्ष मा नितीन जांभळे , सहकार सेल जिल्हाध्यक्ष मा शिरिष देसाई, यांच्यासह मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होते.
या सोहळ्यातील मान्यवर मंडळींचे स्वागत मा.अरिफ तांबोळी यांनी केले .
प्रास्तविक मा यासिन मुजावर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. अरविंद बारदेस्कर, बाळासाहेब देशमुख, मदन कारंडे, मा राजु आवळे, मा अनिल साळोखे व मा ए वाय पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा