शशिकांत घाटगे : जांभळी प्रतिनिधी
यड्राव येथील महालक्ष्मी गॅस मेडिकल ऑक्सिजन कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी अहोरात्रपणे सेवा बजावल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यड्रावच्या महालक्ष्मी गॅस कंपनीमध्ये जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांची नियुक्ती करण्यात आली होती. गेली दोन ते अडीच महिने प्रशासनाचे अधिकारी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने ठाण मांडून होते.मात्र काही प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होत असल्यामुळे सर्वांची नियुक्ती थांबवण्यात आली. त्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकारी मा.संजय काटकर साहेब नायब तहसीलदार शिरोळ, स्नेहल कांबळे शिरोळ तहसील कार्यालय,आरगे साहेब, गावित साहेब,जिल्हाधिकारी कार्यालयातील देशमुख साहेब, दिंडे साहेब,ओंकार साहेब,पंचायत समिती शिरोळ कार्यालय तसेच शहापूर पोलिस स्टेशनचे पोलीस गृहरक्षक दल यांचा यथोचित सत्कार महालक्ष्मी गॅसचे मॅनेजर मा.अमर तासगावे, सचिन राऊत, सर्व ऑफिस स्टाफ व कर्मचारी यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भावनाविवश वातावरणात प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी या कंपनीच्या सर्व घटकांचे मनस्वी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा