Breaking

शनिवार, २६ जून, २०२१

"युवकांनी शाहूंचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवावा: सरपंच ,विशाल चौगुले"

 


  प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी


   अकिवाट येथील श्री विद्यासागर हायस्कूल येथे 'कल्पदृम युथ फौंडेशन' यांच्यावतीने 'राजर्षी शाहू महाराज यांची जयंती' साजरी करण्यात आली.

प्रा.अमोल सुंके यांच्या मार्गदर्शनाखाली फौंडेशनच्या सदस्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

   सुरवातीस प्रा.सुंके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रस्ताविक करताना ते म्हणाले की, श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथील माजी विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हे फाउंडेशन स्थापन झालेले असून त्याचा हेतू सामाजिक बांधिलकी व रचनात्मक काम करणे असा आहे.      

    राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याबद्दल फौंडेशनचे कार्यकर्ते वल्लभ सुतार व स्वप्निल कांबळे यांनी मनोगतेव्यक्त केले.

तसेच प्रा. श्रीहरी माने व प्रा रणजित आवळे यांनी उपस्थित असणाऱ्या मुलांना मार्गदर्शन केले. या सदस्यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार उत्तम पणे पार पडला.

    आदिनाथ पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकिवाटचे सरपंच मा. विशाल चौगुले उपस्थित होते.

युवकांनी राजर्षी शाहूंचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेऊन काम करावे ,अस मत सरपंच चौगुले यांनी मांडले.

तसेच शाहू महाराज यांच्या कार्याचे दूरगामी परिणाम दिसत आहेत. तळागाळातील लोकांना नवजीवन देण्याचे कार्य शाहू महाराज यांनी केलेले आहे असे प्रतिपादन  माजी जि.प. सदस्य इकबाल बैरगदार यांनी केले त्याच बरोबर श्री बाळसिंग रजपूत सर यांनी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने कोल्हापूर जिल्ह्याचे ख्याती जगभर पसरवली आहे असे प्रतिपादन केले त्याच बरोबर श्री रावसाहेब नाईक यांनी असे सांगितले की शाहू महाराजांनी केलेल्या पाणलोट क्षेत्राच्या विकासा मुळेच आज कोल्हापूर जिल्ह्याला चांगले दिवस आलेले आहेत, या कार्यक्रमास ग्रा.प. सदस्य सुनिल रायनाडे मुख्याध्यापक मगदुम सर उपस्थित होते.

        तसेच फौंडेशनच्या सदस्यांनी काळमावाडी वसाहत अकिवाट येथे वृक्षारोपनाचा उपक्रम ही पार पाडला. कल्पद्रुम युथ फाऊंडेशनच्या सदस्यांना प्रा.श्री हरी माने यांचे मार्गदर्शन व सामाजिक कार्यकर्ते तानाजी पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा