Breaking

सोमवार, १४ जून, २०२१

"प्रथम वर्षाच्या प्रवेशाबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री नामदार उदय सामंत निर्णय घेण्याची शक्यता"

 




मुंबई: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यानंतर आता विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशाबाबत (Degree Admission) दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. प्रवेशावरून विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. बारावीच्या निकालानंतरच प्रवेश प्रक्रियेबाबत विचार होणार असून त्यासाठी राज्यातील सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती तयार केली जाणार आहे. येत्या २४ तासांत यावर निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

   कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता पाहता नागपूर, रामटेक, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ३० व्हेंटिलेटर्सचे सामंत यांच्या हस्ते सोमवारी वितरण होणार आहे. त्यानिमित्त नागपुरात आले असता विशेष भेटीदरम्यान त्यांनी बारावीनंतर पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली.

    मंत्री महोदय मा.सामंत म्हणाले, विद्यापीठांमधील पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशाबाबत दोन मतप्रवाह आहेत. एक वर्ग प्रवेशासाठी सीईटीची मागणी करत आहे, तर सीईटी घेतल्याने बारावी निकालावर शंका उपस्थित होईल, असे दुसऱ्या गटाला वाटते. दोन्ही बाजूने विभागाला प्रस्ताव पाठविण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा