Breaking

सोमवार, १४ जून, २०२१

"मा.उपमुख्यमंत्र्यांना माध्यमकर्मीचे रजिस्ट्रेशन,महामंडळ व इतर मागण्यांसाठी एनयुजेमहाराष्ट्र, कोल्हापूर यांचे निवेदन; अजितदादांचा सकारात्मक प्रतिसाद"

                               



      एनयुजेमहाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्रकारांचे रजिस्ट्रेशन व महामंडळ स्थापन करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष सामंत यांनी कोरोनाच्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभ उपेक्षित असल्याचे,या काळात शंभरहुन पत्रकारांचा मृत्यू झाल्याचे व सरकारने जाहीर केलेला विम्याची सरकारकडून अंमलबजावणी झालेली नसल्याचे निदर्शनास आणून दिले.         पत्रकारांचा सन्मान व हक्क मिळावे यासाठी  पत्रकार रजिस्ट्रेशन व महामंडळ स्थापन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.        

      निवेदनासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देताना मा.उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी हा विषय फार महत्त्वाचा आहे. तसेच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना ही अशाच पद्धतीचे निवेदन द्या असे सांगितले.यावेळेस राज्याध्यक्षा शीतलताई करदेकर यांनी स्वतः भेटून निवेदन दिल्याचे  दादांना सांगितले.                                                                        

    कोल्हापूर खजिनदार भुपेश कुंभार यांनी ही चर्चेत सहभाग घेतला. या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी  जिल्हासचिव शेखर धोंगडे,जिल्हा उपाध्यक्ष विनयकुमार पाटील, मारुती गायकवाड,भारत जमणे, इक्बाल इनामदार,सागर जमणे आदी उपस्थित होते.

1 टिप्पणी: