कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल येथील स्वागत कमानीवर लावण्यात आलेल्या एका खाजगी संस्थेची जाहिरात हटवण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील नावाजलेल्या एका उद्योगपतीच्या संस्थेची खाजगी जाहिरात लावण्यात आली होती. परंतु महापालिका प्रशासनाकडे ही जाहिरात काढून टाकण्या संदर्भात सोशल मीडियावरून मागणी केली जात होती. यासाठी काही पुरोगामी संघटना व पक्षाने देखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र अखेरीस महानगरपालिका प्रशासनाने या खासगी संस्थेची जाहिरात हटवली. यानंतर कोल्हापूरकरांनी एकच मोठा जल्लोष केला.
त्यानंतर आज दुपारी शिवसेनेच्या वतीने या स्वागत कमानीवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर करवीर नगरीत आपले सहर्ष स्वागत असा फलक लावून शिवसेना स्टाईल दाखवून दिली.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने करवीरवासीय नागरिकांच्या मागणीचा व भावनांचा विचार करून या स्वागत कमानीवरील जाहिरात हटविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा