अश्विनी शिंदे : जयसिंगपूर प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिरोळ तालुक्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
दि. २१ जून २०२१ रोजी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी निवडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी सुशांत अशोक पाटील,जयसिंगपूर शहर सचिवपदी सुरज बुरांडे व जयसिंगपूर उपाध्यक्षपदी अमित पाटील व सचिन चकोते यांची जाहीर निवड करण्यात आली. याप्रसंगी सदर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या विचार व कार्याचा जागर करीत सामाजिक व राजकीय बांधिलकी जपण्याबाबत तसेच राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचा सन्मान ठेवून शिरोळ तालुक्यातील विद्यार्थी व इतर घटकांसाठी सदैव कार्यरत राहणार असल्याबाबत त्यांनी आश्वासित केले.
यावेळी मनसे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जयराज भाऊ लांडगे, जिल्हा अध्यक्ष गजानन अण्णा जाधव, जिल्हा सचिव यतीन होरणे, जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे, तालुका अध्यक्ष कुमार पुदाले,जयसिंगपूर शहराध्यक्ष लखन उर्फ निलेश भिसे व अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
सध्या तरुण वर्गाचा कल राज साहेब ठाकरे यांच्याकडे जास्त असून येणार्या भविष्यकाळात तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी असंख्य तरुण मनसेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा