![]() |
शिरोळ पोलीस स्टेशन |
करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
आगर फाट्याजवळ काल बांधकाम कॉन्ट्रॅक्टर राजू बनपट्टी यांच्यावर चाकू हल्ला करून फरारी झालेल्या तीन संशयित आरोपीना शिरोळ पोलिसांनी जेरबंद केले.
शिरोळ जयसिंगपूर मार्गावरील आगरफाटा कमानीजवळ काल दुपारी राजू बनपट्टी यांच्यावर चाकू व दगडाने हल्ला करणारे संशयित आरोपीना शिरोळ पोलिसांनी मंगळवारी कर्नाटक कागवाड येथून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.
![]() |
जाहिरात प्रमोशन |
याबाबत मिळालेली अधिकृत माहिती अशी की,सोमवारी सकाळी फिर्यादी रा.५२ झोपडपट्टी, जयसिंगपूर हे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आगरला मोटारसायकलने जात असताना संशयित आरोपी हनुमंता गाडीवडर, संदीप रामू भोसले वय वर्ष ३२ आणि सुरज हनुमंता चौगुले वय वर्षे २१ जयसिंगपुर शाहुनगर ५२ झोपडपट्टी आणि प्रवीण सुभाष कोळी वय वर्ष २२ रा.जैनापूर ता.शिरोळ या चौघांनी फिर्यादीवर दगडाने हल्ला व मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी असा ऐवज लंपास केला होता. सदर संशयित आरोपी कर्नाटक कागवाड जि.बेळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना लागली होती त्या आधारे पोलिसांनी संदीप भोसले सुरज प्रवीण चौगुले आणि प्रवीण कोळी या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यात शिरोळ पोलिसांना यश आले आहे. या शोध पथकामध्ये शिरोळ पोलिस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला, हणमंत माळी व गजानन कोष्टी यांनी सक्रिय सहभाग घेऊन सदर संशयित आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
शिरोळ पोलिसाच्या या जलद व योग्य कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा