Breaking

बुधवार, २३ जून, २०२१

"शिरोळ येथे दुय्यम निबंधक लाच घेताना रंगेहात पकडले"

 


करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी


         शिरोळ येथे प्रमोद नेताजीराव साळुंखे हे शिरोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना २ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले असल्याचे सांगितले.

जाहिरात प्रमोशन


      दस्त नोंदणीसाठी २ हजार लाचेची मागणी प्रमोद साळुंखे यांनी केले होते. तक्रारदार एडवोकेट अमर बुबनाळे रा.मजरेवाडी यांनी ऑनलाइनने लाचलुचपत विभागाला ही तक्रार नोंदविली होती. काल सोमवारी मृत्युपत्राचा नोंदणीसाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर आज पुन्हा मंगळवारी दुपारी बक्षीस पत्राच्या नोंदणीसाठी २ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून पकडलं. पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी ही कारवाई केली. याची नोंद शिरोळ पोलीस ठाणे मध्ये झालेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा