Breaking

शनिवार, ५ जून, २०२१

"जयसिंगपूरातील या भागात मुख्य रस्त्यावर सांडपाणी : प्रशासनाचे दुर्लक्ष,नागरिकांचे आरोग्य धोक्यात"

 



करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी :

     जयसिंगपूर येथील आश्रमशाळेच्या जवळील गटार तुंबून रस्त्यावर सांडपाणी साठून त्याचा दुर्गंध आसपासच्या परिसरात पसरत आहे. तसेच गटार रस्त्यात आहे की रस्ता गटारीत आहे हे देखील ओळखणे अत्यंत कठीण झाले आहे.या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊन डेंगी व चिकुनगुनिया सदृश्य साथीच्या आजारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे अशी मागणी तेथील रहिवाशांची आहे.

      या मोठ्या गटारी लगतच आश्रमशाळा व समोरच जनतारा हायस्कूल, मोदी हॉस्पिटल व कोविड सेंटर, पलीकडील बाजूस न्यायालय, उच्चभ्रू वस्ती व समडोळे मळा असल्याने  येथून येणाऱ्या शाळेतील मुलांच्या बरोबर नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती अशी असेल तर पावसाळ्यात काय असेल याची जाणीव तेथील नागरिकांना अधिकची आहे तसेच हा मार्ग सोडून इतर दूरच्या मार्गांनी लोकांना जावे लागत असल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. तरी जागृत प्रशासनाने हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे अशी मागणी वारंवार तेथील नागरिकांच्या कडून होत आहे.

    



       खरं म्हणजे जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासन कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत कौतुकास्पद व दुसऱ्या लाटेत ही युद्धपातळीवर आपल्या परीने काम करीत आहे. परंतु आपण या कार्याबरोबर जबाबदारीने यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. नाहीतर सध्या सुरू असलेल्या महामारीच्या काळात पुन्हा नवीन संकट ओढवू नये यासाठी प्रशासनाने  योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी येथील नागरिकांची जोरकस मागणी आहे. प्रशासनाने हा प्रश्न सोडवून येथील रहिवासी व परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवावा ही कळकळीची अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा