नवी दिल्ली : दुर्मिळ गोष्टींना जगभरात मोठं महत्त्व असतं. या गोष्टी जितक्या दुर्लभ असतात, तितक्याच त्या अधिक किंमतीही असतात. जगातील प्रत्येक देशाचं स्वत:चं चलन (Old Currency) असतं. याद्वारे लोक आवश्यक त्या वस्तू खरेदी करतात. परंतु प्रत्येक देश वेळेसह आपल्या चलनात, करन्सीमध्ये बदल करतात. त्यामुळे आधी चलनात असलेल्या जुन्या नोटा किंवा नाणी बंद होतात आणि वेळेसह अशा गोष्टी अँटिक होतात.
इंटरनेटवर अँटिक नाणी आणि नोटा विक्री करुन पैसे कमावण्याची चांगली संधी मिळू शकते. पाच रुपयांची एक नोट विकून तुम्ही हजारो रुपये कमावू शकता. या पाच रुपयांच्या नोटेवर काही गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यानंतर या खास पाच रुपयांच्या नोटेच्या बदल्यात ३० हजार रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात.
पाच रुपयांच्या जुन्या नोटेवर ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑनलाईन तीन हजार रुपये मिळू शकतात. या नोटेवर 786 नंबरही लिहिलेला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा जारी या नोटेला अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. तुमच्याकडेही ही नोट असेल, तर तुम्हीही या नोटेच्या बदल्यात पैसे मिळवू शकता.
या नोटेच्या बदल्यात पैसे मिळवण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. ऑनलाईन याची विक्री करता येऊ शकते. coinbazzar.com या नोटेच्या बदल्यात पैसे कमावण्याची संधी देत आहे. या साईटवर जाऊन सेलर म्हणून रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर तुमच्याकडे ट्रॅक्टरचं चित्र असलेल्या नोटेचा फोटो ऑनलाईन अपलोड करावा लागेल. त्यानंतर ज्यांना ही नोट विकत घ्यायची असेल, ते लोक संपर्क करतील आणि घरबसल्या तुम्ही पैसे मिळवू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा