रोहित जाधव / शिरोळ तालुका प्रतिनिधी
ओबीसींचे राजकीय व मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण रद्द झाल्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने चक्का जाम आंदोलन पुकारले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटले आहे. ह्याचाच भाग म्हणुन आज जयसिंगपुर भाजपाने चक्का जाम आंदोलन पुकारले होते.
सुरवातीला छ. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्याच्या पूतळ्याला अभिवांदन तसेच छ. जयसिंग महाराजांच्या पुतळ्याला देखील अभिवांदन करण्यात आले. ह्या प्रसंगी मंडल अध्यक्ष रमेश यळगुडकर,मिलींद भिडे व संतोष जाधव याच्यां हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. सांगली-कोल्हापूर रोडवर झेले चित्र मंदिर जवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
प्रथम माजी मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे म्हणाले की ,भारतीय जनता पक्षातर्फे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशा नुसार एम्पिरिकल डाटा तयार करून तो कोर्टात सादर करावा लागेल. हेच महत्वाचे काम राज्यसरकार करण्यात टाळाटाळ करीत आहे. शांत मंडल अध्यक्ष रमेश यळगुडकर यावर भाष्य करताना म्हणाले की, जोपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही. तोपर्यंत भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही. आणि महाविकास आघाडी सरकारला झोपू सुध्दा देणार नाही. महाविकास सरकारची अनास्था या आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत आहे. शाहू,फुले, आंबेडकर यांची नावे घ्यायची आणि त्यांचे विचार आचरणात आणायचे नाहीत. असे या सरकारचे चालले आहे.
यावेळी सरचिटणीस राजेंद्र दाईगडे,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संतोष जाधव, उपाध्यक्ष सुनिल ताडे, पी आय चे अब्दूल बागवान,आमीर नदाफ आदी कार्यकर्ते उपस्थित होते .चक्का जाम आंदोलन करून रास्ता रोखण्यात येऊन आंदोलन यशस्वी केले बद्दल दाईगडे यांनी सर्वांचे आभार मानले. सदर आंदोलकांनी वेळेचे पालन न केल्यामुळे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी आंदोलकांना अटक करून पुन्हा सोडून दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा