मुंबई: काही वेळापूर्वी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील काही जिल्हे अनलॉक केले असल्याची माहिती दिली होती. तेव्हा राज्य सरकारने पुढे येत अजुन अनलॉक करण्याची स्थिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मंत्री विजय वडेट्टीवार तोंडघशी पडले आहेत.
कोरोना संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. करोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाच टप्प्यात राज्यात अनलॉक केले जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सरकारकडून त्याबाबत स्पष्टीकरण आल्याने अनलॉक नेमके कसे होणार हे शासन निर्णय जारी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा