बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ अद्याप प्रदर्शित झालेला नाही. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबलेले आहे. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘सूर्यवंशी’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड’ने दिलेल्या वृत्तानुसार सूर्यवंशी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख ठरवली आहे. ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट गृहांमध्ये १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा