Breaking

शनिवार, १२ जून, २०२१

"RTO ची टेस्ट न देताही काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स"



नवी दिल्ली  : वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आरटीओमध्ये होणारी टेस्ट टाळून तुम्हाला वाहन चालवण्याचा परवाना मिळू शकतो. त्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयानं (Ministry of Road Transport) मान्यता दिलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल, त्यानंतर या सेंटरकडून प्रमाणपत्र मिळेल. त्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स घेताना आपल्याला टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. देशभरात ही अधिकृत प्रशिक्षण सेंटर 1 जुलै 2021 पासून सुरू होत आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयानं याबाबत नवा आदेश जारी केला आहे.

                 रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे महत्त्वाचे कारण म्हणजे योग्य प्रशिक्षित चालकांचा अभाव. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सध्या देशात 22 लाख वाहन चालकांची कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते व परिवहन मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वांनुसार देशभरात चालक प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मंत्रालयाच्या नियमांनुसार लोक अशी केंद्रं उघडू शकतात, ज्यामध्ये लोकांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण दिल्यानंतर चालकाची चाचणी घेतली जाईल आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रमाणपत्र  दिले जाईल, त्या आधारे चाचणी न देता आरटीओ कार्यालयातून ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा