Breaking

शनिवार, २६ जून, २०२१

"छत्रपती शाहू महाराज हे पुरोगामी व समतावादी विचारांचे पुरस्कर्ते"

 


 प्रा.अक्षय माने/ कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी

     दि.कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी. आर. माने महाविद्यालय,कागल मध्ये २६ जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त इतिहास मंडळ व इतिहास विभागाच्या वतीने  ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  प्रमुख पाहुणे व वक्ते डॉ. विकास सरनाईक (रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद)  हे सहभागी होते.

    'राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक धोरण' या विषयावर

 मांडणी करताना डॉ विकास सरनाईक यांनी शाहू कालीन समाज जीवनाचा सांगोपांग पद्धतीने आढावा घेतला. यामध्ये वेदोक्त प्रकरण, वसतिगृह चळवळ, जाती निर्मूलनाची चळवळ, आंतरजातीय विवाह यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन समाजातील तत्कालीन वास्तव परिस्थितीबाबत विवेचन केले. 

    यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शाहू महाराजांच्या समतावादी समाज रचनेबाबत भाष्य करून सद्यपरिस्थितीत संविधान वाचवून लोकशाही बळकट करावयाची असल्यास शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करणे गरजेचे आहे.




     या कार्यक्रमाचे स्वागत  व प्रास्ताविक त्याचबरोबर पाहुण्यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष जेठीथोर यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे आभार प्रा. राहुल पाटील यांनी मानले. यावेळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबादचे प्राचार्य. डॉ. जयसिंगराव देशमुख व प्रा.राबाडे, प्रा. सुरेश पाटील व त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच डी. आर. माने महाविद्यालयाचे प्रा. श्रीनिवास पाटील प्रा. विनायक खोत, प्रा. संदीप वाडीकर व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि एन. सी. सी. कॅडेट बहुसंख्येने ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन कु. पुष्पलता गोविंदगोल यांनी केले.

     या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडण्यात आले यामुळे आजचा कार्यक्रम हा  युवा पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे.

1 टिप्पणी: