सौंदर्या पोवार /प्रमुख प्रतिनिधी :
जयसिंगपूरचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.श्रीवर्धन शामगोंडा पाटील यांनी कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजाची मनोभावे व निस्वार्थी भावनेने करीत असलेल्या उदात्त सेवेबद्दल भाजपाच्या कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विभागाच्यावतीने कोविड योद्धा गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मुळात तत्कालीन काळातील सुप्रसिद्ध धन्वंतरी कालवश डॉ.एस.के.पाटील यांच्या कडून वैद्यकीय सेवेचा व मानवतावादी दृष्टिकोन जोपासणारे संस्कार व प्रामाणिक वैद्यकीय वारसांची शिदोरी घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवित त्यांचे जेष्ठ पुत्र व सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्रीवर्धन शामराव पाटील हे अखंडितपणे सामाजिक व वैद्यकीय पेशाच्या माध्यमातून समाजाची सेवा करीत असतात. त्यांच्या सेवेबद्दल कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील असंख्य रुग्ण व नागरिक त्यांच्याविषयी आपुलकीने व मनापासून कौतुक करीत असतात.विशेष करून गोरगरीब व कष्टाळू लोकांच्या विषयी असलेलं ममत्व व दातृत्व यामुळे ते सर्वांना सुपरिचित आहेतच अशा या वैद्यकीय पेशामध्ये माणूसकी जपणाऱ्या या डॉ. श्रीवर्धन यांना कोविड योद्धा पुरस्कार मिळणे हे एक प्रकारे त्या पुरस्काराचे ही स्थान बळकट झाल्यासारखे आहे.
या कोविड योद्धा गौरव पुरस्काराच्या प्रसंगी डॉ.श्रीवर्धन पाटील म्हणाले की, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून समस्त रुग्णांचा व नागरिकांचा सन्मान करणार आहे त्यामुळे या पुरस्काराला एक वेगळे महत्त्व आहे. तसेच पुनश्च एकदा या पुरस्काराने रुग्णांची व समाजाची सेवा करण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे त्यामुळे पुढील काळात अधिकची सेवा देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन अशाप्रकारचे उत्तम भाष्य त्यांनी केले.
सदर कोविड योद्धा गौरव पत्रावर समरजीत घाटगे, अध्यक्ष भाजपा ग्रामीण कोल्हापूर जिल्हा व राहुल चिकोडे, अध्यक्ष भाजपा,कोल्हापूर जिल्हा यांचे सह्या असलेले हे 'कोरोना योद्धा गौरव पत्र'जयसिंगपूर शहर भाजपचे अध्यक्ष मिलिंद भिडे, सुनिल ताडे, राजेंद्र दाईंगडे व रमेश यळगुडकर हे भाजपचे पदाधिकारी यांनी हा पुरस्कार स्वतः उपस्थित राहुल डॉ.श्रीवर्धन पाटील यांना बहाल केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा