Breaking

मंगळवार, ८ जून, २०२१

" कोल्हापूर जिल्ह्यातील या गावात चांदी व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या"

 


 कोल्हापूर जिल्ह्यातील चांदीसाठी  किंवा चंदेरी गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुपरी गावात एका ५५ वर्षीय चांदी  व्यापाऱ्याने आजाराला कंटाळून स्वतःवर पिस्तूल मधून गोळ्या झाडून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हुपरी गावचे सदर चांदी व्यापारी हे कोरोना बाधित असल्यामुळे उपचारही सुरू होते मात्र नुकताच डिस्चार्ज ही मिळाला होता. परंतु आजाराला वैतागून त्यांनी स्वत:वर बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी उपस्थित असून सदर घटनेचा तपास सुरू केला आहे.

     सदर घटनेमुळे हुपरी व परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा