![]() |
दफनभूमी शेडचे काल्पनिक चित्र |
करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने आठ दिवसांपुर्वी जयसिंगपुर शहरांमध्ये दहनभुमीचे शेड उभारावे , आणि शहरातील बेवारस प्रेतावर मोफत नगरपरिषदेने अंत्यसंस्कार करावेत या मागणीसाठी जयसिंगपुर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली होती. पण जयसिंगपुर नगर परिषदेने या मागणीची कोणतीच गांभीर्याने दखल न घेतल्याने उद्या राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे पदाधिकारी जिवंत समाधी घेणार आहेत.
शहरातील ज्वलंत प्रश्नासाठी जिवंत समाधी घेतली जात असतांना नगरपरिषदेकडुन मात्र गांधारिची भुमिका घेतल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे . तसेच नगरपरिषदेच्या कारभाराविषयी शहरात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा