Breaking

शुक्रवार, ११ जून, २०२१

"एमएचटी- सीईटी २०२१ प्रवेश परीक्षा प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी व निश्चिती करणे सुरू"

 


    मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान,औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी "एमएचटी- सीईटी -२०२१  प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

      सदरील परीक्षेसाठी उमेदवारांनी खालील तालिकामध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहे.


👉🏼 संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जाची नोंदणी आणि निश्चिती करणे ➡️  मंगळवार, दिनांक ०८ जून ,२०२१ ते बुधवार, ७ जुलै,२०२१ (रात्री ११.५९)


👉🏼 विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्जाची नोंदणी आणि निश्चिती करणे ➡️  गुरूवार, दिनांक ८ जुलै ,२०२१ ते गुरूवार, १५ जुलै,२०२१ (रात्री ११.५९)


    सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थी/ पालक /संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी.

संकेतस्थळ :- www.mahacet.org

     वरील माहिती महाराष्ट्र शासन, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष,महाराष्ट्र राज्य,मुंबई ज्यांच्या दिनांक ०८/०६/२०२१ च्या प्रेस नोट नुसार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा