जीवन आवळे : प्रमुख प्रतिनिधी
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संजय अण्णाप्पा नंदीवाले वय वर्ष ३४ हे दुपारच्या वेळेस वीट भट्टीच्या कामावरून घरी परतल्यानंतर घरातील सुरू असलेले शेडचे काम करण्यापूर्वी दुपारच्या वेळेस पोहण्यासाठी म्हणून विहारीमध्ये गेले होते.सदर तरुणाने पोहण्यासाठी म्हणून थेट विहिरीमध्ये उडी मारली. काही वेळाने विहिरी जवळ असणाऱ्या तरुणांच्या लक्षात आले की विहिरीमध्ये उडी मारून तो तरुण परत वरती आला नाही म्हणून तेथे उपस्थित असणाऱ्या तरुणांनी आरडाओरडा करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु मयत संजय नंदीवाले हा तरुण त्यांना सापडला नाही. अशा परिस्थितीत वजीर रेस्क्यू फोर्स शिरोळ या टीमला पाचारण करण्यात आले. या रेस्क्यू फोर्सच्या अथक प्रयत्नानंतर सदर इसमाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
घटनास्थळी पंचनामा करून कोथळीचे बीट अंमलदार मगदूम व पटेल हे पुढील तपास करीत असून मृत्यूचे नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. संजय नंदीवाले यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे
पंचनाम्याच्या वेळी घटनास्थळी शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती राजगोंड पाटील, कोथळी गावचे पोलीस पाटील किरण खंडागळे, उमळवाड गावचे पोलीस पाटील विजय कुराडे इत्यादी उपस्थित होते. घटनास्थळी शेकडो नागरिक जमले होते.
घडलेल्या या दुर्दैवी घटनेविषयी सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा