दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचे तब्येत बिघडल्यामुळे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज बारावीच्या परीक्षेच्या दृष्टीने निर्णय होण्याची शक्यता होती पण त्यांची तब्येत बिघडल्यामुळे १२ वी परीक्षेचा अंतिम निर्णय पुढे जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना वायरसमुळे त्यांची तब्येत बिघडली असल्याचे कळते.
शिक्षणमंत्री निशंकनी २१ एप्रिलला ट्विट करून माहिती दिली होती की, ते कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत त्यामुळे माझ्या संपर्कात असलेल्या व्यक्तीनी कोरोना टेस्ट करून घ्यावी. त्याचबरोबर मंत्रालयात सुरु असलेलं कामकाज सामान्य पद्धतीने चालू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
मात्र अचानकपणे त्यांच्या तब्येत बिघडल्यामुळे CBCS बोर्डाच्या निर्णयाबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार होते परंतु तब्येतीमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे देशातील सर्व घटकाकडून या निर्णयाबाबत उत्सुकता होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा