Breaking

सोमवार, २८ जून, २०२१

"जयसिंगपूर कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने कालवश शीतल बाबर यांच्या कुटुंबीयांना दिल्या जीवनावश्यक वस्तू"

 


करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी


     विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे कर्मचारी कालवश शीतल(राज) बाबर यांच्या दुर्दैवी निधनानंतर 'जयसिंगपूर कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने' जीवनावश्‍यक वस्तूंची मदत शीतल बाबर यांच्या कुटुंबीयांना देऊ केली.


        रविवार दि.११ एप्रिल २०२१ रोजी विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारा नम्र, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असणारा कर्मचारी शीतल बाबर याचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या मृत्यूने कॉलेजमधील प्रत्येक घटक अस्वस्थ व भावनाविवश झाला होता. मुळात शीतल बाबर यांची आर्थिक परिस्थिती बेताची तसेच आई-वडील वृद्ध व आजारी असल्याने कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरती होती. परंतु काळाने त्याच्यावर घाला घालून हसऱ्या व प्रामाणिक तरुणाला आमच्यातून हिरावून नेले. अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र नैराश्यपूर्ण वातावरण होते. यासाठी कुटुंबाला छोटीशी मदत व्हावी म्हणून या माजी विद्यार्थी संघटनेकडून जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम देण्यात आली.

        कॉलेज घेतलेल्या शोकसभेत संस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे व प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी बाबर यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी आवाहन केले. या केलेल्या आवाहनानुसार कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या संचालक मंडळाकडून स्वयंस्फूर्तीने यथाशक्य होईल तेवढी मदत देऊ केली. 



         यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.ए.ए.पुजारी व उपाध्यक्ष कनकभाई शहा, संस्थेचे सचिव प्रा.डॉ.प्रभाकर माने, खजिनदार प्रा.डॉ.महावीर बुरसे, संस्थेचे सदस्य ए.बी.कांबळे व सुनील कोळी यांनी जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदतीसाठी सहकार्य केले. 

      जीवनावश्यक वस्तू बाबर कुटुंबीयांना देऊ करत असताना प्रा.डॉ.सौ.मनिषा काळे,प्रा.डॉ.प्रभाकर माने, प्रा.डॉ.महावीर बुरसे व मालोजीराव माने हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा