Breaking

सोमवार, २८ जून, २०२१

कोरोना लस घेण्याआधीच पेनकीलर, पॅरासिटोमॉल औषध घेत असाल तर सावधान; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

     



जिनिव्हा: करोना लसीकरणाबाबत दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहे. त्याचीच दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने करोना लस घेण्याआधीच पेनकिलर्स, पॅरासिटोमॉल औषधे घेणाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे.


      करोना लस घेतल्यानंतर होणारी वेदना दूर करण्यासाठी लसीकरणाआधीच पेनकिलर न घेण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लस घेण्याआधीच पेनकिलर्स औषधे घेतल्याने लशीची परिणामकता कमी होऊ शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र, करोना लस घेतल्यानंतर पेनकिलर औषधे घेतल्यास लशीच्या प्रभावावर परिणाम होणार नसल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.


     करोना लसीकरणानंतर अनेकांना हाताला वेदना जाणवतात. त्याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, ताप आदी लक्षणे दिसून येतात. अशावेळी पेनकिलर अथवा पॅरासिटोमॉल औषधे घेण्यास काही हरकत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी म्हटले.


     करोना लस घेण्याआधी पेनकिलर्स, पॅरासिटेमॉलसारखी औषधे घेण्याची शिफारस करण्यात आली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लस घेण्याआधीच ही औषधे घेतल्यास लशीच्या प्रभावावर कितपत परिणाम होतो, हे अद्याप सांगता येत नसले तरी त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा