Breaking

शुक्रवार, १८ जून, २०२१

"इचलकरंजी शहरात डेंग्यूने घेतला दुसरा बळी; युवकाचा दुर्देवी मृत्यू"



 मालोजी माने /कार्यकारी संपादक :


    कोरोना महामारीचे  संकट इचलकरंजी शहर व आसपासच्या परिसरात असताना अशावेळी शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढून नवीन आजाराला बळ मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणून पुन्हा आणखी एका युवकाचा डेंग्यू आजाराने दुर्देवी मृत्यू झाला आहे.

         इचलकरंजी शहरात २ दिवसांपूर्वी कुडचे मळा परिसरात एका युवकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाले असल्याची बातमी ताजी असताना आज पुन्हा एका तरुणाचा नाहक बळी गेला. प्रसिद्ध उद्योगपती श्री लक्ष्मण गणपते यांचे चिरंजीव सौरभ लक्ष्मण गणपते वय वर्ष २५ रा.कुडचे मळा यांचा डेंग्यू आजाराने दुःखद निधन झाले असून ते यंत्रमाग कारखानदार होते. डेंग्यू आजाराने मृत्यू ओढविल्यामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

      खरं म्हणजे वातावरणीय बदल व पावसाळ्याची सुरुवात या पार्श्वभूमीवर सर्वत्र डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असून चिकुनगुन्या व डेंगी रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यासाठी  इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाने वेळीच लक्ष घालून पुढचा होणारा अनर्थ टाळावा अशा प्रकारची मागणी शहरातील नागरिकाकडून होताना दिसत आहे. तसेच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करीत घर व परिसरात डासांची पैदास होणार नाही यासाठी स्वतः जबाबदारीने लक्ष घालून प्रयत्न करावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा