Breaking

बुधवार, १६ जून, २०२१

"जयसिंगपूर शहरात स्मशानभूमीची मागणी मान्य न झालेस जिवंत समाधी घेणार;राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचा इशारा"

 

मुख्याधिकारी, टीना गवळी


करण व्हावळ / जयसिंगपूर प्रतिनिधी :


    जयसिंगपूर नगरपालिकेच्या हद्दीत स्मशानभूमी नसल्याने येथील प्रेतांवर उदगाव हद्दीतील अंकली टोल नाक्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात.

    छत्रपती शाहू महाराजांनी जयसिंगपूर शहराची निर्मिती केली असल्याने या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. सन २०११ च्या जनगणने प्रमाणे जयसिंगपूर शहराची लोकसंख्या ४८ हजार ६५० इतकी होती. तब्बल दहा वर्षात जयसिंगपूर शहराची लोकसंख्या निश्चितपणे प्रचंड वाढली असल्याचे दिसून येत आहे.मात्र जयसिंगपूर सारख्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या या प्रगत शहरात स्मशानभूमी नसणे ही अत्यंत खेदाची आणि दुर्देवाची गोष्ट आहे.तसेच जयसिंगपूर नगरपरिषद हद्दीतील बेवारस प्रेतांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचीही कोणतीच सोय नगरपरिषदेकडे उपलब्ध नसल्याने व अंकली टोल नाक्यावरील स्मशानभूमीत लाकुड वखारीचा ठेका खाजगी व्यक्तीला दिल्याने येथे एक मण लाकडासाठी ३५० रूपये द्यावे लागतात. एक प्रेत जाळण्यासाठी सरासरी ८ ते ११ मण लाकडे लागत असल्याने एका प्रेतासाठी एकूण खर्च सरासरी ३ ते ४ हजार रूपये येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेही ही स्मशानभूमी सर्वात महागडी असल्याचे नागरिकांकडून मानली जात आहे.



    जयसिंगपूर नगरपरिषदेकडे बेवारस प्रेतावर अत्यंविधीची कोणतीच सोय नसल्याने व अंकली टोल नाक्यावरील महागड्या लाकडासाठी बेवारस प्रेत अंत्यविधीच्या प्रतिक्षेत अनेक तास पडून रहात असल्याने बेवारस प्रेतांची किंबहुना मनुष्यजातीची विटंबना होत होत असल्याचा त्यांनी म्हटले आहे.

        वरील पाश्वभूमीवर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने जयसिंगपूर नगरपरिषदच्या मुख्याधिका-यांना निवेदन देऊन ८ दिवसांत जयसिंगपूर शहरात स्मशानभूमीचे शेड उभारावे तसेच सर्वांनाच अगदी माफक दरामध्ये अंत्यविधीसाठी लाकडे व शेणी उपलब्ध करून द्यावे.त्याचप्रमाणे नगरपरिषदेने बेवारस प्रेतांवर मोफत अत्यंविधी करावा अशा मागणीचे निवेदन जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी मा.टीना गवळी यांना दिले आहे.

पोलीस निरीक्षक,मा.दत्तात्रय बोरिगिड्डे


   सदर निवेदनाची मागणी मान्य न झालेस दि. २३ जून २०२१ रोजी नगरपरिषदेसमोर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे पदाधिकारी जिवंत समाधी घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

     सदर निवेदनाच्या प्रती कोल्हापुर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख, शिरोळ तहसिलदार , डी.वाय.एस.पी. जयसिंगपूर उपविभागीय,पोलीस निरीक्षक, जयसिंगपूर यांना देण्यात आल्या आहेत.

      सदर निवेदन राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे संस्थापक  संजय भोसले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. गंगाराम सातपुते व महाराष्ट्र राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल पोवार यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा