Breaking

सोमवार, २१ जून, २०२१

"शिरोळ पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोना काळात सामाजिक संवेदनशीलता दाखवत गरीब व गरजू घटकांना मदत"

 



 गीता माने / सहसंपादक :

        कोल्हापूर जिल्हा मा.पोलीस अधीक्षक यांच्या  'मिशन संवेदना' या उपक्रमाच्या माध्यमातून  कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेच्या वतीने कोरोना काळात गरीब व गरजू घटकांना मदत करण्याच्या हेतूने लमाण वस्ती व डवरी सोसायटी मध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य पोलीस ठाण्याचे वतीने करण्यात आले.

       दि. १०/६/ २०२१ रोजी शिरोळ पोलीस ठाणे व श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थान नृसिंहवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ हा कुटुंबांना आठ दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचा किटच्या माध्यमातून वाटप करून संवेदनशीलता दाखविण्यात आली.        




     सुरुवातीस मा.एसडीपीओ, जयसिंगपूर मा.रामेश्वर वैंजने व दत्त देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष मा.मेघशाम पुजारी, विश्वस्त प्रा.गुंडू पुजारी, महादेव पुजारी, विकास पुजारी,अमोल विभुते यांच्या हस्ते नांदणी नाका येथील लमाण तांडा व डवरी सोसायटी व नांदणी नाका झोपडपट्टीमध्ये राहणारे व खडी फोडणारे गरीब व गरजू घटकांना ७५ रेशनचे किट वाटप केले. 

     यावेळी मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.कुंभार साहेब,पोलीस उपनिरीक्षक मा.नवनाथ पोलीस अंमलदार मदन मधाळे, पोलीस अमलदार राजेंद्र धुमाळ, राजू ओंबासे, अभिजीत हनुमंत माळी, होमगार्ड शशी दंडे,अफाक, महेश वडर व मिरजे हा सर्व स्टाफ उपस्थित होता. शासन नियमांना अधीन राहून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

     या सामाजिक संवेदनशील उपक्रमामुळे शिरोळ पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

1 टिप्पणी: