देशातील सर्वात सर्वात मोठी व जगात सर्वात जास्त शाखा असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यात तरुणांना करिअर (Career) करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) डिसेंबर 2020 मध्ये फायर इंजिनिअरच्या 16 जागांसाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यासाठी 11 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र, कोरोना साथीच्या (Coronavirus) रोगामुळे या उमेदवारांना अर्ज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या व्यतिरिक्त, अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्जही चुकले होते. या सर्व अडचणी लक्षात घेता, स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
SBI ने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, आता उमेदवार भरतीसाठी 15 जून 2021 पासून बँकेच्या https://www.sbi.co.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरू शकतात. यासाठी शेवटची तारीख 28 जून 2021 आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार www.safalta.com यावर सुरू असलेल्या मोफत लाइव्ह क्लासेसमध्येही या लिंकच्या सहाय्याने https://www.safalta.com/free-courses-21 येथे सहभागी होऊ शकतात.
महत्वाच्या तारखा : अर्ज सादर करण्याची तारीख - 15 जून 2021अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 28 जून 2021दुरुस्तीची अंतिम तारीख - 28 जून 2021पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराने नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधील (एनएफएससी) बीई (फायर) बीटेक, बी.ए. (सुरक्षा आणि अग्निशमन अभियांत्रिकी), बी.टेक / बी.ई. (अग्नि तंत्रज्ञान आणि सुरक्षा अभियांत्रिकी) अथवा बीएससी (फायर) पदवी घेतलेली असावी. या व्यतिरिक्त, यूजीसी / एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांकडून चार वर्षांची पदवी घेतलेली असावी.अर्ज फी : या भरतीसाठी उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागेल.
पगार : उमेदवारांना 23700 - 980/7 - 30560 - 1145/2 - 32850 - 1310/7 - 42020 म्हणून पगार देण्यात येईल.निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीव्दारे करण्यात येणार आहे.
तरी पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा