Breaking

शनिवार, ३ जुलै, २०२१

धक्कादायक ❗अभिनेता आमिर खान व पत्नी किरण या दोघांनी 15 वर्षाच्या संसारा नंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

 


     बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता अमिर खान याने आपल्या पत्नी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. जरी हा अमिर आणि किरण यांचा दोघांचा निर्णय असेल तरीही, या वृत्ताने त्यांचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

     या दोघांनी २८ डिसेंबर २००५ ला लग्न केले होते. त्यानंतर आता तब्बल १५ वर्षे सोबत संसार केल्यानंतर या दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे.


     घटस्फोटाबाबत दोघांनीही ऑफिशियल स्टेटमेंट प्रसिद्ध केले आहे.


        घटस्फोटाविषयी निवेदन जारी करत त्यांनी लिहिले, “की सुंदर वर्षात आम्ही आयुष्यभराचे अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केले आहे आणि आमच्या नात्यात फक्त विश्वास, आदर आणि प्रेम वाढले आहे. आता आम्ही आमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करू इच्छितो. यापुढे पती-पत्नी म्हणून नव्हे, तर एकमेकांसाठी सह-पालक आणि कुटुंब म्हणून राहू.”

महत्वाचे म्हणजे, आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. त्याचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते. हे नातेही जास्त काळ टिकू शकले नाही आणि लग्नाच्या काही वर्षांनंतर त्याचा घटस्फोट झाला. त्याने किरण रावसोबत २८ डिसेंबर २००५ रोजी लग्न केले होते. तर लग्नाच्या तब्बल १५ वर्षांनी घटस्फोटाची घोषणा केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा