कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष 2020-2021 मधील मार्च/ एप्रिल,2021 उन्हाळी सत्रातील परीक्षेचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी विद्यापीठाने महाविद्यालय मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठ ,अधिविभाग स्तरावर विद्यार्थ्यांच्या कडून परीक्षा अर्ज विनाविलंब, विलंब शुल्क व अतिविलंब शुल्कानुसार स्वीकारण्याबाबत संदर्भीय पत्रानुसार कळविले होते. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली आहे.
Covid-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अधिकार मंडळाने शैक्षणिक वर्ष 2020-2021 मधील मार्च-एप्रिल 2021 उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या विलंब व अतिविलंब शुल्कात 100 टक्के सवलत देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला असल्याने परीक्षा शुल्काबाबत कोणत्याही विद्यार्थ्याकडून विलंब शुल्क(Late Fee) अथवा अतिविलंब शुल्क(Super Late Fee) स्वीकारण्यात येवू नये.
विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरण्याबाबत व महाविद्यालय परीक्षा यादया सादर करण्याबाबत खालील प्रमाणे सुधारित तारखा प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
👉🏼 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अथवा पदव्युत्तर अधिविभागांमध्ये परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखा (विनाविलंब शुल्क) दि.०५/०७/२०२१ ते दि. २६/०७/२०२१
👉🏼 महाविद्यालयांनी विद्यापीठांमध्ये परीक्षा अर्जाच्या यादया सादर करावयाच्या तारखा (विनाविलंब शुल्क) दि.२८/०७/२०२१
👉🏼 महाविद्यालयात व पदव्युत्तर अधिविभागाने परीक्षा अर्ज ऑनलाइन Approve करण्याच्या तारखा खालील प्रमाणे दि.२७/०७/२०२१ अखेर आहे.
सबब,सर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरिता परीक्षा अर्ज भरण्याच्या सुधारित तारखा व परीक्षा शुल्क सवलती बाबतचे परिपत्रक सर्व संबंधित विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी यांच्या निर्दशनास आणावे.
अशा प्रकारची माहिती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर परिपत्रक क्रमांक- 7 दि.१३ जुलै,२०२१ नुसार प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ मा.गजानन पळसे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयानी दिलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा फॉर्म व शुल्क भरून फॉर्म लवकरात लवकर सादर करावेत असे आव्हान मा.गजानन पळसे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा