शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी - रोहित जाधव
समाजातील, अनाथ, निराधार, बालकामगार तसेच स्थलांतरित बालकांच्या शिक्षणाच्या अधिकारांसाठी महाराष्ट्रासह देशपातळीवर कार्यरत असणार्यास अवनि या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी समाजसेविका अनुराधा भोसले यांची बहुमताने निवड करण्यात आली.
गेली २५ वर्षे अनुराधा भोसले या संस्थेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या आहेत. अवनि संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्यानंतर संस्था कार्यकारिणीने अनुराधा भोसले यांना अध्यक्षा तर श्री संजय पाटील यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले आहे. अवनि संस्थेसाठी पूर्णवेळ सेवाभावीपणे गेली ११ वर्षे कार्यरत असणारे स्कॉट कफोरा यांची कायमस्वरूपीचे निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली येथील शांति निकेतन महाविद्यालयचे माजी प्राचार्य प्रा. जे. बी. कदम हे संस्थेचे सचिव असून कोल्हापूर येथील शिरगावकर इंडस्ट्रिजचे प्रमुख श्री सोहन शिरगावकर, प्रा. अर्चना जगतकर, प्रा. विजय पाटील, प्रा. ज्ञानदेव माने व प्रा. साखरे हे अवनिचे कार्यकारिणी सदस्य आहेत.
अवनि संस्थेचे वंचित, निराधार तसेच स्थलांतरित बालकामगार व बाल भिक्षेक्र्यांोसाठी पुनर्वसनाचे व संगोपणाचे कार्य सध्या कोल्हापूरसह सांगली, सातारा व मराठवाड्यातीलन ६ जिल्ह्यात सुरू असून संस्थेच्या या कार्याचा गौरव महाराष्ट्रसह देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला आहे.
अवनिच्या कार्यास कोल्हापूर येथील प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डों. सूरज पवार, डों. रेशमा पवार, डों. मंजुळा पिशवीकर, डों. सुजाता खोत, श्री अरुण नरके, गोकुळ दुध संघ, डों. विवेक हळदवनेकर यांचे अविरतपणे सहकार्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा