जगात अनेक ठिकाणी मृतदेह जतन करून ठेवण्याची पद्धत आहे. अशाच एका मृतदेहामध्ये अर्धवट पचलेलं अन्न सापडलं आहे. डेन्मार्क इथे ही आश्चर्यकारक घटना घडली आहे.
डेन्मार्कच्या सिल्केबॉर्ग संग्रहालयात ठेवलेल्या 2400 वर्षं जुन्या मृतदेहात हे अन्न सापडलं आहे. हा मृतदेह 71 वर्षांपूर्वी जुटलँड पेनिनसुला येथे सापडला होता. इसवी सन पूर्व 300मध्ये या व्यक्तिचा मृत्यू फास लागल्याने झाला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून हा मृतदेह जतन करून ठेवण्यात आला आहे. नीना नीलसन नावाच्या इतिहास संशोधकाच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकाने या मृतदेहावर संशोधन केलं. या मृतदेहावर संशोधन करतानाच संशोधकांना या अन्नाबाबत माहिती मिळाली.
या व्यक्तिने मृत्यु होण्याच्या 12 ते 14 तास आधी जेवण केलं होतं. त्याच्या जेवण्यात मासे आणि अन्य दोन पदार्थ होते. मात्र, त्याचं अन्न पचलं नाही. ते अद्यापही त्याच स्थितीत त्याच्या मोठ्या आतडीत सापडले आहेत.
या संशोधनानुसार मृत्युपूर्वी या माणसाची तब्येत ठीक नव्हती. कारण त्याच्या आतड्यात परजीवी सापडले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा