प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
शिरोळ: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची आज शुक्रवार सकाळी शिरोळ तालुक्यात येऊन शिरोळ व नृसिंहवाडी या गावांना भेटी देत पूर परिस्थितीचा आढावा घेतला व येथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दित महापुरामुळे नुकसान झालेल्यांना पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी शासन नुकसानभरपाई देण्यासाठी लवकरच धोरण जाहीर करेल असे त्यांनी सांगितले. यावेळी पूरग्रस्त नागरिकांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या मात्र मुख्यमंत्री साहेबांच्या आश्वासित धोरणाची भविष्यात पूर्तता होईल अशी अपेक्षा बाळगून पूरग्रस्त नागरिक परत गेले.
यावेळी नामदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या व्यथा व अडचणी मुख्यमंत्र्यां समोर पोटतिडकीने मांडल्या.
या भेटीदरम्यान नामदार हसन मुश्रीफ,नामदार सतेजपाटील,खासदार धैर्यशील माने,विभागीय आयुक्त सौरभ राव,,जिल्हाधिकारी राहुल रेखावर,
विशेष पोलीस महानिरीक्षक एस. एम. लोहिया,जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड,
प्रांताधिकारी विकास खरात,तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ यांच्यासह शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी आपल्या व्यथा मांडण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस विभागाकडून चोख व कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा