Breaking

शुक्रवार, ९ जुलै, २०२१

*कुरुंदवाडात राजवाडा परिसरात गजबजलेल्या ठिकाणी 3 लाख 63 हजारांची चोरी - श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण*




शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी - रोहित जाधव


  कुरुंदवाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी गजबजलेल्या ठिकणी एक बंद असलेले घराचे कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 63 हाजार रूपये किंमतीचे दागिने आणि काही रोकड लंपास केली आहे. बुधवारी सकाळी ही चोरी उघडकीला आली. शहरात गजबजलेल्या वस्तीत हा धाडसी चोरी झाल्याने  एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान घटनास्थळी श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे यावेळी डी वाय एस पी बाबुराव महामुनी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे,उपपोलीस निरीक्षक अमित पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली याबाबतची फिर्याद दत्तात्रय मोरेश्वर फाटक यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे  

       याबाबत अधिक माहिती अशी कुरुंदवाड येथील राजवाडा परिसरातील दत्तात्रय मोरेश्वर फाटक याच्या घरातील सर्वजण सोमवारी पुण्याला नातेवाईकांच्याकडे गेले होते घरी कोणीच नव्हते याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानी सोमवार दि. 5 ते बुधवार दि 7 दरम्यान  दत्तात्रय फाटक  यांच्या बंद घराचा दरवाजाचे कडी कोयंडा उचकटून  अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील तिजोरी व  कपाटे फोडून अंदाजे सहा  तोळ्यापेक्षा अधिक सोन्याचे दागिने तसेच 2 किलो चांदी व रोख रक्कम 40 हाजार  असे एकूण 3 लाख 63 हाजारचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेले आहे.याबाबत शेजाऱ्यांना बुधवारी  सकाळी फाटक यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी फाटक याना फोनवरून माहिती दिली आणि फाटक हे ताबडतोब दुपारपर्यत कुरुंदवाड मध्ये आले आणि घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी लगेच कुरुंदवाड पोलीस ठाणेत चोरीची फिर्याद दिली यावेळी पोलिसांनी तात्काळ बेली नामक श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.बेली नामक श्वान पथकाने घराशेजरी जवळपास अर्धा किलोमीटर अंतरापर्यत घुटमळत राहिले तर ठसे तज्ञांनी घरातील तिजोरी आणि कपाटावरील ठसे घेतले.  दरम्यान  डी वाय एस पी मा.बाबुराव महामुनी ,पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे,पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी घटनास्थळी माहिती घेऊन त्या ठिकणी असणाऱ्या CCTV ची पाहणी केली रात्री उशीरापर्यत तपासकार्य सुरू होते.

      सदर घटनेमुळे कुरुंदवाड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा