मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
शिरोळ : शनिवारी शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराचे जवान दाखल होतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली होती.
सायंकाळी ही तुकडी दाखल झाली. यानंतर या तुकडीतील जवानांनी विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचविले.
आज दिवसभर शिरोळ तालुक्यातील विविध भागांत पावसाने काहीशी उसंत घेतली होती. मात्र कोयना व वारणा धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातून निसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. या विसर्गामुळे सांगली कोल्हापूर रस्त्यावरील रेल्वेच्या ओवर ब्रिज खालील रस्त्यावर आहे पाणी आले आहे.
त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे सांगली व कोल्हापूर चा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या कृष्णा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी जयसिंगपूर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर अंकली पुलावर गर्दी करीत आहेत. नागरिकांनी वाहत्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा