रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रतिनिधी
बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ मध्ये चातुर्मास कलश स्थापना समारोह उत्साहात संपन्न झाले. चातुर्मासात बाहुबली मध्ये आचार्य १०८ श्री. धर्मानंदसागर महाराज, मुनी १०८ श्री अपूर्वसागर महाराज, मुनी १०८ श्री अर्पितसागर महाराज,मुनी १०८ श्री क्षेमसागर महाराज, मुनी १०८ श्री देवधरसागर महाराज, आर्यिका १०५ श्री ज्ञानमती माताजी, आर्यिका १०५ श्री चेतनामती माताजी, आर्यिका १०५ श्री विमुक्तमती माताजी हे त्यागीगण पावन वर्षायोग बाहुबली मध्ये संपन्न करत आहेत,या वेळी बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ चे संचालक बी टी बेडगे गुरूजी, अधिक्षक ए ए खाडे, मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, अरूण चौगुले, रवींद्र देसाई, बाबगौंडा पाटील यांनी विश्वस्त व पदाधिकारी यांच्या वतीने त्यागींना चातुर्मास संपन्न करण्याचे भक्तीपूर्वक निवेदन करण्यात आले. तसेच पादपूजन, अर्घ्यावली करून ग्रंथभेट दिले.
यावेळी त्यागींचे आशीर्वचन होऊन मेरी भावनाने कार्यक्रम संपन्न झाले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक डॉ नेमिनाथ बाळीकाई यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा