![]() |
संग्रहित |
मुंबई : बकरी ईदनिमित्त मुंबईच्या देवनार कत्तलखान्यात जास्तीत जास्त 300 बकऱ्यांची कुर्बानी देता येईल, असा निर्णय मुंबई महापालिकेनं (BMC) घेतला आहे. या निर्णय़ाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आक्षेप घेणारी याचिका न्यायालयानं (Mumbai High Court) फेटाळून लावली आहे. कोरोना काळात धार्मिक भावनेपेक्षा सार्वजनिक आरोग्याला अधिक प्राधान्य देणं गरजेचं आहे, असं सांगत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.
सध्या कोरोनाच्या काळात आरोग्य हाच अग्रक्रम असणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. किती बकऱ्यांच्या कुर्बानीला परवानगी द्यायची, हा प्रशासनाचा प्रश्न असून त्यात न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, केवळ धार्मिक भावना सुखावण्यासाठी आरोग्याच्या प्रश्नांवर तडजोड करता येणार नाही.
- मुंबई उच्च न्यायालय
BMC-
गेल्या वर्षीदेखील कोरोनाची पहिली लाट असल्यामुळे केवळ 50 बकऱ्यांच्या कत्तलीला परवानगी देण्यात आली होती. यंदाची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बरी असल्यामुळे 300 बकऱ्यांच्या कत्तलीची परवानगी देण्यात आली आहे. तरी सर्वांनी नियमांचे पालन करत सन साजरा करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा