रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी
शिरोळ : चंद्रकांत केरबा माने वय वर्ष 37 धंदा शिक्षक, रा.हरोली ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांनी फिर्याद दिली की, फिर्यादी हे दि. 4.3.2021 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हरोली गावचे हद्दीत भूपाल सुतार यांच्या पत्र्याच्या शेडजवळ रोडवर फिर्यादी हे जेवण करून शतपावली करीत असताना त्यांचे पाठीमागून काळ्या रंगाचे मोटारसायकल वरून दोन अज्ञात इसम येवून मागे बसलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादी यांच्या हाताला जबरदस्तीने हिसाडा मारून त्यांचे हातातील विवो वाय 30 कंपनीचा मोबाईल काढून घेवून भरधाव वेगाने पळून गेले अशी फिर्याद दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास करून तसेच गुन्ह्याचा गोपनीय बातमी मार्फत बातमी काढून सदर गुन्ह्यातील संशयित इसम तेजस कृष्णा सुतार वय वर्ष 19 राहणार अयोध्यानगर , खोत वाडी ता. हातकणंगले, ओंकार रवींद्र बीचकर वय वर्ष 21 रा.साईट नं 102 आसाराम नगर इचलकरंजी ता. हातकणंगले या दोघांना गुन्हे शोध पथकाने सापळा रचून चौडेश्र्वरी फाटा परिसरातून ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनीं गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्ह्यातील vivo कंपनीचा मोबाईल किंमत 8 हजार व गुन्हा करताना वापरलेली होंडा डिओ मोटारसायकल MH09 FH 5789 किंमत 60 हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई शैलेश बलकवडे पोलिस अधीक्षक कोल्हापूर,जयश्री गायकवाड अप्पर पोलिस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, रामेश्वर वैंजने उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नवनाथ सुळ,पोलिस हेड कॉन्स्टेबल हनुमंत माळी,पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील,ठाणे,पोलिस अंमलदार ताहिर मुल्ला व अभिजित परब या पथकाने केली आहे.
संशयित आरोपींना पकडण्यात शॅडो पोलीस यशस्वी झाल्यामुळे शिरोळ पोलीस ठाण्याच्या या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा