![]() |
संग्रहित |
कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केवळ अत्यावश्यक सेवांसाठी केला जाईल, त्यामुळे नागरिकांना पेट्रोल, डिझेल दिले जाणार नाही. असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरही पाणी आल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अंतर्तगत मार्ग बंद झाले आहेत. या सर्व कारणांमुळे इंधनाचे टँकर जिल्ह्यामध्ये येणे अशक्य आहे. त्यामुळे इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन पुरवठा केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिस वाहने, आरोग्य विभागाची वाहने, रुग्णवाहीका, वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्ती यांची शासकीय किंवा खासगी वाहने, सर्व प्रकारची शासकीय वाहने, कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची वाहने, ज्या स्वयंसेवी संस्था पूरनियंत्रणाच्या कामात कार्यरत आहेत त्यांच्यी वाहने. एन.डी.आर.एफ, व्हाईट आर्मी, विमानतळ प्राधिकरणाची वाहने, मदत कार्य करणारी वाहने यांनात पेट्रोल-डिझेल दिले जाणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. असेही आदेशात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा