हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने तीन दिवस जोरदार पाऊस पडत असून यामुळे जिल्ह्यातील बरेच रस्ते खचले आहेत. अशाच प्रकारे पन्हाळ्याजवळील ही रस्ता खचला असून त्यामुळे गडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. २०१९ च्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्ण खचला होता. त्यामुळे गडावर जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाली आहे.
प्रशासनाकडून सदर रस्ता बंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी सतर्क राहावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा