कोल्हापूर : आज (शुक्रवार दि.१६) महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच एच.आय.व्ही(HIV) रुग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव अशा लोटस मेडिकल च्या ए.आर.टी. व केअर सेंटरला भेट दिली. यावेळी संस्थेच्या चेअरमन मा.उषा थोरात यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले सदरच्या भेटीदरम्यान त्यांनी आय.पी.डी. व ओ.पी.डी.विभागाची पाहणी केली.
डाँ. किमया शहा यांनी एच.आय.व्ही.बाधित रुग्णांवर मोफत औषधे व उपचार देण्यात येतात याची माहिती दिली. तसेच एच.आय.व्ही. बाधित मुलांसाठी चाईल्ड अँडाँप्शन या प्रकल्पाची, तसेच या मुलांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पंदन या कार्यक्रमाची महिती दिली. त्यावेळी संस्थेतर्फे चालविल्या जाण्याऱ्या स्थलांतरित कामगार प्रकल्प आणि एच.आय.व्ही बाधित पालकांकडून मुलांना होणारा HIV प्रतिबंध या प्रकल्पांची माहिती दिली.
यावेळी मा. राजेश टोपे यांनी संस्थेच्या कामाचे व कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आणि लोटस केअर सेंटर मध्ये कोविड लसीकरण सेंटरसाठी सहकार्य करण्याबाबत चे आश्वासन दिले. आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे आणि संस्थेचे ट्रस्टी श्री.व्हि.बी. पाटील सर, श्री. रमाकांत भिंगार्डे सर, श्री.सुनिल गुंडाळे सर आणि कर्मचारी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन डॉ. निरंजन शहा यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा